महाराष्ट्र

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या लेखणीतून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – कर्तृत्ववान,दृष्ट्या व भविष्याचा वेध घेणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! ना. श्री. अमितजी विलासरावजी देशमुख हे कर्तृत्वाची झळाळी असणारं नेतृत्व. स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणातील एक एक पायरी वर चढत जाणारे राज्यातील युवा नेते म्हणून ना.अमितजी देशमुख साहेब यांना ओळखले जाते. आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या बळावर राज्याला दिशा देणारी धोरणे आखून त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणारे ना.अमितजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कोरोनाच्या काळात त्यांनी केलेली कामगिरी सर्वांच्याच लक्षात राहणारी आहे. कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना राज्यात केवळ दोनच तपासणी केंद्र होती. ही गरज ओळखून ना.अमितजी देशमुख यांनी या केंद्रांची संख्या वाढवली. आज अशा केंद्रांची संख्या राज्यात पाचशेपेक्षा अधिक आहे.
आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा विडा त्यांनी उचलला. यामुळेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे धोरण त्यांनी आखले. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे स्वप्न आहे. स्व.वसंतदादा पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जाळे उभे केले होते. त्याचा किती लाभ होतो हे राज्यातील जनतेने आजवर पाहिलेले व अनुभवलेले आहे. त्याच पद्धतीने आपल्या नेतृत्वाने राज्यासाठी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा आहे.

जाहिरात


कोरोनाच्या जागतिक महामारीत ना.अमितजी देशमुख यांनी स्वतःला झोकून देत काम केले. धोरणात्मक निर्णय घेतले. यामुळेच या महामारीला राज्याला सक्षमपणे तोंड देता आले. या महामारीतून राज्याला सावरण्याची भूमिका त्यांनी घेतली.
राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम करणारा ७०:३० हा कोटा रद्द करणारा निर्णयही ना.अमितजी देशमुख साहेब यांच्यामुळेच घेण्यात आला. यामुळे वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांवर दूर होणारा अन्याय त्यांनी दूर केला.
आपल्याकडे असणाऱ्या खात्याच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिकाधिक कसे देता येईल याचा प्रयत्न ना.अमितजी यांनी केलेला आहे. हाफकिन संस्थे द्वारा देखील कोरोना लसीची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. योगायोगाने नुकतीच त्याला मान्यताही मिळाली. यामुळे लसींचे उत्पादन आणि लसीकरणाचा वेगही वाढण्यास मदत होणार आहे.
कर्तृत्वाचा महामेरू असणाऱ्या या लातूरच्या नेतृत्वाकडून राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. केवळ लातूरचा नाही, मराठवाड्याचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे. त्या दिशेने त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे.
राज्यातील जनतेचे हे स्वप्न श्री सिध्देश्वर कृपेने लवकरात लवकर पूर्ण होवो,याच शुभेच्छा!
अशा या कर्तृत्ववान,दृष्ट्या व भविष्याचा वेध घेणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! त्यांना उदंड,निरोगी आयुष्य लाभो याच शुभकामना!
विक्रांत गोजमगुंडे
महापौर
लातूर

Most Popular

To Top