पोलीस

लातूर MIDC पोलिसांनी गुजरात मध्ये जाऊन चोराच्या आवळल्या मुसक्या.

महाराष्ट्र खाकी (लातूर ) – लातूर पोलीस दलाचा कारभार निखील पिंगळे यांनी स्विकारल्या पासून लातूर पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीत कमालीचा फरक जाणवतो आणि दिसून येतो याचीच एक कामगिरी दि .10/03/2021 रोजी पोलीस स्टेशन MIDC लातूर येथे फिर्यादी सुहास बापुराव पाचपुते वय 49 वर्ष रा. लक्ष्मी कॉलनी, लातूर यांनी फिर्याद दिली की, माझे श्री मोरया इन्फ्रा सोल्युशन्स अँन्ड व्हेंनचर्स प्रा.लि.या कंपनीचे गोडावुन असुन सदर गोडावुन मध्ये हिंन्दुस्थान युनिलिव्हर या कंपनीसोबत डीस्ट्रीब्युटरशीप असून सदर कंपनीचा तयार माल मी छोटे मोठे रेणापुर तालुका लातूर ग्रामीण व औसा दुकानदारांना विक्री करतो. सदरचे गोडावुन दि .09/03/2021 रोजी रात्री 10.45 ते दि.10/03/2021 रोजी पहाटे 4.40 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने गोडावुन फोडुन त्यामधील वेगवेगळया कंपनीचे साबन, कॉफी,चहापत्ती,क्रिम, सॉस असा एकुण 9,84,150/-रुपयाचा माल चोरुन नेला. फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन MIDC लातूर येथे FIR.NO 176/2021 कलम 457,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आला. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक /जी.बी.कदम यांचेकडे देण्यात आला.

जाहिरात


या गुन्हयाच्या तपासासाठी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक जी.बी.कदम
व पोलीस उपनिरीक्षक के.बी.नेहरकर यांच्या नेतृत्वाखाली दोन टिम करण्यात आल्या. गुन्हयाच्या तपासा दरम्यान
गोपनिय व तांत्रिक माहीतीचे विश्लेषन करुन गुन्हयातील वापरण्यात आलेला ट्रक नंबर G.J.31 T
3710 निष्पन्न करुन हा ट्रक गुजरात मधील गोध्रा येथे असल्याची माहीती मिळाली या माहितीवरून तपास
पथक गुजरात येथील गोध्रा येथे गेले व स्थानिक पोलीसांच्या मदतीने चोरीचा माल, आरोपी
मोहसीन जियाओदीन टपला वय 30 वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा. उडणबाजार जी.गोध्रा ता.पंचमहल राज्य
गुजरात यास नमुद ट्रकसह ताब्यात घेतले. आरोपी कडुन 14,16,072/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात
आला आणि गुन्हयातील इतर आरोपीचे नाव निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध चालु आहे.

ही कामगिरी मा.निखील पिंगळे पोलीस अधीक्षक,लातुर, श्री.हिम्मत जाधव अपर पोलीस
अधिक्षक,लातूर, श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी,लातूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री
गजानन भातलंवडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,लातूर, श्री संजीवन मिरकले पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे एमआयडीसी नेतृत्वाखाली जी.बी.कदम, के.बी.नेहरकर पोलीस उपनिरीक्षक यांनी त्याचे
पथकातील पोलीस अमंलदार राजेंद्र टेकाळे, राजाभाऊ मरके, युवराज गिरी, सिध्देश्वर मदने, निलेश जाधव
यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Most Popular

To Top