Maratha kunbi कुणबी जात प्रमाणपत्राची प्रक्रिया झाली सोपी; कुणबी नोंद शोधा, वंशावळ जोडा अन् अर्ज करा जी. श्रीकांत यांनी व्हिडिओद्वारे सांगितली संपूर्ण माहिती
महाराष्ट्र खाकी (छत्रपती संभाजीनगर / विवेक जगताप ) – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या जुन्या अभिलेखांमधील नोंदी शोधण्याची प्रक्रिया आता नागरिकांसाठी अधिक सुलभ झाली आहे. न्यायमूर्ती (निवृत्त) शिंदे समितीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या कुणबी-मराठा नोंदी आता गावनिहाय ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली,…
