Latur police “रोग एकीकडे, इलाज दुसरीकडे!”; लातूरमध्ये हेल्मेट सक्तीवरून नागरिक हक्क संघर्ष समिती आक्रमक
महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) — जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीविरोधात नागरिक हक्क संघर्ष समिती आक्रमक झाली असून, प्रशासनाच्या या तुघकली निर्णयाविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर सुरक्षेच्या कारणास्तव हेल्मेट सक्ती योग्य असली, तरी शहरांतर्गत भागात ही सक्ती लादणे नागरिकांच्या जिवावर उठणारे आणि नाहक त्रास देणारे ठरणार आहे,…
