गुन्हेगारांविरुद्धच्या संतापाला राजकीय चष्यातून पाहू नका; राजाभाऊ दुर्गे यांचा सुप्रिया सुळेंवर जोरदार पलटवार
महाराष्ट्र खाकी (पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या हिंसक हल्ल्यात केसरेकर दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला. या अमानुष आणि संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या अशा नृशंस प्रवृत्तींचा कठोर शब्दांत निषेध होणे आणि दोषींना कायद्यानुसार फासावर लटकवणे, हीच आज संतप्त समाजाची एकमेव…
