धाराशिव जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांची नायचाकूर आरोग्यवर्धिनी केंद्राला भेट; जन आरोग्य समितीची बैठक संपन्न
महाराष्ट्र खाकी (उमरगा / विवेक जगताप) – धाराशिव जिल्हा परिषद सदस्य तथा जन आरोग्य समितीचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी उमरगा तालुक्यातील नायचाकूर येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन जन आरोग्य समितीची बैठक घेत आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीदरम्यान आरोग्य केंद्राच्या विविध कामकाजावर चर्चा करण्यात आली. नागरिकांना अधिक दर्जेदार, प्रभावी व सुलभ आरोग्य सेवा…
