महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप / उमरगा ) – उमरगा तालुक्यातील दूधनाळ येथे प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या शिव महापुराण कथेस लाखो भाविकांची प्रचंड गर्दी, आरोग्य विभागाने उभारली उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा. धाराशिव जिल्ह्यातील मौजे दुधनाळ येथे कथावाचक प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या ‘श्री शिव महापुराण कथा सोहळ्या’ला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरणात सुरू असलेल्या या कथा सोहळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची आरोग्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी उमरगा आरोग्य विभागाने उत्तम व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेचे विशेष कौतुक होत आहे.
उमरगा आरोग्य विभागाची प्रशंसनीय भूमिका
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या नेतृत्वात आणि नायचाकूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नूर यांच्या नियोजनात एक उत्कृष्ट आरोग्य शिबिर उभारण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये वृद्ध, महिला, लहान मुले आणि इतर भाविकांना आवश्यक असलेली सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाणी, ओआरएस, प्राथमिक उपचार, औषधे आणि डॉक्टरांची टीम सतत उपलब्ध ठेवण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे. या सुविधेमुळे अनेक भाविकांनी आरोग्य विभागाचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून कौतुक
धाराशिव व उमरगा भागातील लोकप्रतिनिधींसह भाविकांनी आरोग्य विभागाच्या या तत्परतेला आणी THO डॉ. उमाकांत बिराजदार आणी त्यांच्या टिमच्या कार्याला मुक्तकंठाने दाद दित आहे. प्रदीप मिश्रा यांच्या कथेच्या भक्तिमय वातावरणात आरोग्य विभागाने दिलेली ही सेवा खरोखरच आदर्श आणि जनहितकारी ठरत आहे.



