Dharashiv jilha धाराशिवकरांना आणीबाणीतील घडामोडीच्या इतिहासाची माहिती मिळणार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

महाराष्ट्र खाकी (धाराशिव / प्रतिनिधी ) –  आपल्या देशात 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेला आज 25 जून रोजी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळातील घटनांचा इतिहास छायाचित्र व माहितीच्या स्वरुपात या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळत आहे. या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आणिबाणीतील सर्व घटनाक्रम व इतिहासाची नागरिकांना माहिती मिळत आहे. असे

प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणीबाणीच्या कालावधीतील छायाचित्र व माहिती प्रदर्शनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते आज फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा

अधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार ज्योती चव्हाण व अभिजीत जगताप यांच्यासह जिल्ह्यातील आणीबाणीत सहभाग घेतलेले नागरिक, त्यांचे वारसदार यांच्यासह विद्यार्थी, नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. हे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्वांसाठी खुले राहणार असून नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Recent Posts