लातूर उस उत्पादक शेतकरी यांच्याकडून दिलीपराव देशमुख, अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा होणार गौरव

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्या च्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण मांजरा साखर परिवाराने केले असून त्यातून जिल्ह्यात आर्थिक क्रांती घडवून आणणारे भाग्यविधाते राज्यांचे माजी मंत्री सहकार महर्षी मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख , राज्याचे वैद्धकिय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे

पालकमंत्री अमित देशमुख,जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांचा गौरव सोहळा गुरुवारी 26 मे रोजी लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दगडोजी देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यात उस उत्पादक शेतकरी यांच्याकडून गौरव करण्यात येणार आहे यासाठी लातूर जिल्ह्यातील

उस उत्पादक शेतकरी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गौरव संयोजन समितीचे सदस्य राजेंद्र मोरे सत्तार पटेल अरुण कुलकर्णी नवनाथ शिंदे राजू कसबे यांनी केले आहे