आमदार अभिमन्यू पवार यांची दूरदृष्टी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लातूर जिल्हा रुग्णालयाचे 500 खाटांपर्यंत विस्तारीकरण करण्याची मागणी

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा रुग्णालयाच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेल्या नव्या जिल्हा रुग्णालयाची मागणी बऱ्याच संघर्षानंतर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली. आता १०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाला निधी मंजूर झाला असून, कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे. लवकरच भूमिपूजन होणार असून, बांधकाम सुरू होईल. यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची आनंददायी बातमी आहे.

पण यावर थांबून न राहता, आमदार अभिमन्यू पवार यांनी भविष्याचा विचार करून दूरदृष्टी दाखवली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता सद्य: १०० खाटांचे रुग्णालय अपुरे पडेल, असे लक्षात घेऊन त्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे ५०० खाटांपर्यंत वाढीव बांधकाम मंजूर करण्याची मागणी केली आहे.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या मागणीचे मुख्य मुद्दे
1) सद्य मंजूर १०० खाटांऐवजी ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर करावे.
2) सुधारित आराखडा तयार करून, सध्याच्या निधीअंतर्गत टप्पा १ म्हणून काम सुरू करावे.
3) उर्वरित कामासाठी टप्पा २ अंतर्गत स्वतंत्र मंजुरी द्यावी.

ही मागणी लातूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी दर्जेदार आणि पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठीची आहे. आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खांदे समर्थक आणि विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी दोन पाऊल पुढे असतात, हे त्यांच्या मागील विकासकामांमधून सिद्ध झाले आहे. आता जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीतही त्यांची ही दूरदृष्टी लातूरकरांसाठी मोठी आशा निर्माण करत आहे.

लातूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत होण्याच्या दिशेने ही एक सकारात्मक पावलं आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांच्या अशा विकासात्मक आणि भविष्यनिष्ठ प्रयत्नांना लातूरकरांचा पूर्ण पाठिंबा आहे. लवकरच ही मागणीही मंजूर होऊन लातूरला आधुनिक ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मिळेल, विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्याचे काम नेहमीच लोकांसाठी प्रेरणादायी ठरते.

Recent Posts