महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रतिनिधी ) – भारतीय संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा सन्मान राखत संविधान सन्मान सभा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन लातूरचे माजी खासदारप्रा. डॉ. एडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि भारतीय बौद्ध महा सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न
आंबेडकर होते. त्यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्त्व, समतेचा संदेश आणि सामाजिक न्यायाचे मोल यावर सविस्तर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कार्यक्रमात सर्वराजकीय पक्षांचे नेते मंचावर एकत्रउ पस्थित होते, ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि संविधानाच्या सार्वभौमिकमूल्यांचा आदरअधोरेखित
झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अतिशय चांगले कामकरत आहेत. देश-विदेशात बौद्ध समाजाचे प्रश्न मांडण्याचे, त्यावर उपाययोजना सुचवण्याचे आणि जागतिक स्तरावर बौद्ध विचारांचा प्रसार करण्याचे कार्य ते समर्थपणे पार पाडत आहेत.”आम्ही सारे बौद्ध आपल्या
सोबत आहोत.भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न आपण साकार करूयात. या सभेला विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. संविधान सन्मान सभेच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांची जपणूक, आणि समता, बंधुता व न्यायाचे विचार रुजवण्याचा प्रयत्न झाला. कार्यक्रमाला निलंगा तालुक्यातील उपासक उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
