महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) –लातूर जिल्हा क्रेडाई जिल्हा अध्यक्ष पदग्रहण सोहळा लातूर येथिल हॉटेल कार्निवल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लातूर जिल्हा क्रेडाई पदग्रहन समारंभास, माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर मा. मंत्री आ. अमित देशमुख यांच्या उपस्थित नूतन अध्यक्ष उदय पाटील ,सचिव विष्णू मदने व त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडे क्रेडाईचा पदभार सुपूर्द केला. लातूरसह
महाराष्ट्रात बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय आणी प्रसिद्ध नाव असलेल्या अधिराज ग्रुपचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी निर्माण केलेल्या गृह प्रकल्पामूळे सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण केले आहे आणी करत आहेत. बांधकामचा उत्तम दर्जा, वास्तुशास्त्रानुसार शासनाचे नियमाचे पालन करून लोकांना उत्तम आणी प्रशस्त घरे उपलब्ध करून देण्याचे काम उदय पाटील हे करत आले आहेत. बांधकाम क्षेत्रातील उत्तमअनुभव
आणी लोकांच्या विश्वासामुळे उदय पाटील यांना लातूर जिल्हा क्रेडाई अध्यक्ष पदाची जिम्मेदारी मिळाली आहे. अध्यक्ष पदाला उत्तम न्याय देऊन बांधकाम क्षेत्रातील इतर बांधकाम व्यवसाईकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले. उदय पाटील यांच्या गृह प्रकल्पा मुळे लातूरच्या वैभावात आणी सौन्दर्यात भर पडली आहे. जागतिक पातळीवर आणी बांधकाम क्षेत्रातील आधुनिकतंत्रज्ञाण
वापरून लातूरच्या बांधकाम क्षेत्रात लातूरचे बांधकाम व्यावसायिक लातूरच्या वैभवात भर पडतील यात शंका नाही आणी हे सर्व उदय पाटील यांच्या कार्यकाळात होईल हा विश्वास लातूर क्रेडाई सदस्य आणी सामान्य माणसाला विश्वास आहे. स्वभावाने मितभाषी, अभ्यासु असलेल्या उदय पाटील हे एक उत्तम बांधकाम व्यावसायिक आहेत पण त्याहून ते एक जिम्मेदार नागरिक आहेत हे त्यांच्या इतर सामाजिक कार्यातून
दिसून येते. उदय पाटील यांनी जगभरातील लातूरकरांना एकत्र करण्यासाठी मातृभूमी फाऊंडेशनची सुरुवात केली आहे. एक उत्तम व्यवसायिक, एक अभ्यासू नागरिक, समाजाचे काहीतरी देणे लागते याची जाणीव असणारे उदय पाटील हे या अध्यक्षपदाला पूर्ण न्यायदेतील यात शंका नाही. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव, महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, क्रेडाई नॅशनल काउन्सीलचे सुनिल
फुरडे, डॉ. धर्मवीर भारती, लातूर जिल्हा क्रेडाईचे माजी अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, माजी सचिव संतोष हत्ते, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, मा. नगरसेवक डॉ. अमित पाटील, आशिष कामदार, अमोल मुळे, महेश नावंदर, श्रीकांत हिरेमठ,
नागनाथ गित्ते, नितीन मंठाळे, जयकांत गित्ते, आकाश कोटलवार, विक्रम सुरवसे पाटील, रितेश अवस्थी, सुरज मंत्री, पुष्कराज हेड्डा, रश्मी बेलंबे, स्मिता सरसंबेकर,आनंद साळूंके आदिसह लातूर जिल्हा क्रेडाईचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
