महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – राजकीय द्वेषापोटी एका राष्ट्रीय पक्षाचे घराणेशाहीमुळे झालेले अध्यक्ष यांना कोर्टाने आपली जागा दाखवली आहे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालायने गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यसैनिकांविषयी टिपण्णी करण्यास परवानगी दिली
जाणार नाही. अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास स्वतःहून कारवाई केली जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच तुमच्या आजी (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) या सावरकरांचे कौतूक करत होत्या, असेही न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर सावरकर प्रेमी आणी भाजपा नेत्याकडून प्रतिक्रिया येत आहेत, अशीच एक मार्मिक आणी जाहरी प्रतिक्रिया देत महाराष्ट्र भाजपा प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी
कोर्टाच्या निकालावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी, सर्वोच्च न्यालयाने राहुल गांधींना सुनावले खडे बोल! केवळ राजकीय द्वेषापोटी एका राष्ट्रीय पक्षाचे घराणेशाहीमुळे झालेले अध्यक्ष यांना कोर्टाने आपली जागा दाखवली आहे, याचा आनंद वाटतो.” प्रेरणा होनराव या राज्य आणी नॅशनल प्रसार माध्यमातून केंद्र आणी राज्य सरकारची बाजू
अभ्यास पूर्ण, मुद्देसूद प्रभावीपने मांडत असतात, आणी सरकारचे कार्य आणी भाजपा पक्षाचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहचवत असतात, प्रेरणा होनराव यांच्या प्रतिक्रिया एकदम मोजक्या शब्दात आणी तथ्यासह मांडत असतात शासच पद्धतीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालायने गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणी प्रेरणा होनराव यांनी मार्मिक आणी जहरी प्रतिक्रिया देऊन मत वेक्त केले.
