महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील हॉटेल व्यावसायिक नेहरू शंकरराव देशमुख यांना मराठा सेवा संघाच्या मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्रा च्या वतीने “उद्योजक रत्न 2025” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था जळगावच्या वतीने खानदेशातील पहिले आणि राज्यस्तरीय तिसरे महा अधिवेशन भव्य दिव्य स्वरूपात जळगाव
येथील छत्रपती संभाजी राजे नाट्य गृहात पार पडले. या अधिवेशनात लातूर येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक नेहरू देशमुख यांना उद्योजक रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, नेहरू देशमुख हे हॉटेल व्यवसायात मागील सात – आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. अगदी खडतर परिस्थितीतुन नेहरू देशमुख यांनी “लक्ष्मी “नावाचे हॉटेल सुरुवात करून त्यांनी अनेक जणांनच्या हाताला काम दिले आणी स्वतःसह अनेक
परिवाराचा आधार बनले. नेहरू देशमुख यांना अंतराष्ट्रीय मराठा उद्योजक कक्षाचे अध्यक्ष संजय वायाळ पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन उद्योजक रत्न म्हणून सन्मानित केले. या ऐतिहासिक अधिवेशनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजे शंभूराजे आणि मा. जिजाऊ यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. यावेळी “मराठा उद्योजक परभणी विशेषांक” या मासिकाचा प्रकाशन सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश दादा चव्हाण, महाराष्ट्र राज्य कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, नामवंत उद्योजक सतीश मगर (पुणे), राजेंद्रसिंह पाटील, राजेंद्र शिंग पाटील, वैभव (दादा) तळेकर, संजय वायाळ पाटील, विशाल देसले, डीडी बच्छाव सर, रोहित दादा निकम, संगीता पाटील, सुनील जी किर्दक, सुदाम पाटील, संजय पाटील (उपाध्यक्ष) आणि राज्य समन्वयक सुधाकर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
