डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच केला आहे – माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा विभागीय कार्यशाळेचे आयोजन लातूर येथील भक्ती शक्ती हॉलमध्ये करण्यात आले. या कार्यशाळेत सहभागी होताना माजी खासदार आणि संसदरत्न पुरस्कारप्राप्त डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा सन्मान भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनीच केला

आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने 13 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान’ राबविण्यात येणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर ही विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. गायकवाडम्हणाले, “पंचतीर्थाचाविकास, दिल्लीतीलडॉबाबासाहेबआंबेडकरयांच्यानिवासाचेस्मारक,इंदूमिलयेथीलभव्यडॉबाबासाहेबयांचेस्मारक, महूयेथीलजन्मभूमीडॉबाबासाहेबआंबेडकरस्मारक, संविधानदिन व संविधान

सप्ताहाची साजरीकरण, विशेष संविधान अधिवेशनाचे आयोजन, बौद्ध जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शासकीय सुट्टी—हे सर्व सन्मान नरेंद्र मोदी सरकारनेच दिले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करणारे सरकार हे भाजपाचेच आहे.” या कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक संशोधन कांग्रेस ने केले आहे. बाबासाहेब यांचा

सर्वाधिक सन्मान भाजपा सरकार नेच केला आहे. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, प्रा. पंडित सूर्यवंशी, दिग्विजय काथवटे, संजय कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतोष वाघमारे तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये आंबेडकरी विचारसरणीशी एकात्मता साधत, समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत भाजपाचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Recent Posts