लातूरचे सुपुत्र मा. खा.डॉ.सुनील गायकवाड यांचा भारत गौरव आयकॉनिक अवार्डने सन्मान

महाराष्ट्र खाकी ( दिल्ली /प्रतिनिधी ) – दादासाहेब फाळके आइकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशन मुंबई कडून आसाम चे माजी राज्यपाल जगदीश मुखी आणि बीजेपी ओबीसी मोर्चा अध्यक्ष के लक्ष्मण आणि गुरुजी यांच्या हस्ते भारत गौरव आयकॉनिक अवार्डने लातूर चे माजी खासदार तथा सुप्रीम कोर्ट चे ॲड. संसद रत्न प्रोफेसर डॉ.ॲड. सुनील गायकवाड यांना मेनी मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृती चिन्ह देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला. लातूर चे लोकप्रिय संसद रत्न

माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर ॲडव्होकेट डॉ सुनील गायकवाड यांनी खासदार म्हणून केलेले कामे लातूर लोकसभा मतदार संघात दोनशे बेड चे सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पासपोर्ट सेवा केंद्र, NEET Exam सेंटर,नेशनल हाईवे, अनेक नवीन रेल्वे सुरू, पिट लाईन, रेल्वे स्टेशन चे आधुनिकीकरण, हिंदी लायब्ररी, उदगीर, लातूर रोड, लातूर रेल्वे स्टेशन वर नवीन प्लेटफॉर्म ,तिन्ही ठिकाणी रेल्वे दादरा, खासदार फंड मधून रेल्वे स्टेशन वर प्रवाशांना बसण्यासाठी स्टील चे खुर्ची सोफा,लातूर

रेल्वे स्टेशन वर व्हीआयपी लाउंज, रेल्वे बोगी कारखाना, जलयुक्त शिवार कामासाठी खासदार निधीतून करोडो ची कामे, रेल्वे नी पाणी आणले,लातूर शहरात खासदार फंड मधून 100 बोरवेल दिले, लातूर शहरात महिला आणि पुरूष साठी स्वच्छता गृह उभारले, खासदार फंड मधून शहरात सिटी बस चा थांबा बांधून दिला, सांसद आदर्श ग्राम अनसरवडा चा संपूर्ण विकास केला, जवळपास 700 गावांमध्ये वेगवेगळ्या कामा साठी खासदार  निधी  दिला, कैंसर आणि हार्ट पेशंट ला प्रधानमंत्री

यांच्या कडून जवळपास करोडो पेक्षा ज्यास्त मदत केली,दीडशे पेक्षा ज्यास्त वकिलांना भारत सरकार कडून नोटरी बनविण्यासाठी शिफारस करून नोटरी बनवले,लातूर शहरातील ब्लैक स्पॉट बंद केले ,टेंभुर्णी रस्त्या साठी अनेक वेळा लोकसभेत मागणी केली,रत्नागिरी नागपूर हाईवे सुरू व्हावा यासाठी लोकसभेत मागणी केली, अनेक अनाथ मुला मुलीना मदत केली, गरीब मुलाना शिक्षणासाठी मदत केली,अशा सर्व कामाची दखल घेऊन आंध्रा ऑडिटोरियम लोधी रोड दिल्ली येथे

अवार्ड देऊन डॉ सुनील  गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला  माजी राज्यपाल जगदीश मुखी, माजी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, माजी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली , नागालँड चे राज्यमंत्री, खा.शर्मा ,दुबई चे डॉ कबीर उद्योगपती डॉ खालिद मणिपूर, इंपाल, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आदी राज्यातून विविध क्षेत्रांतील मान्यवर कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन गरिबोंके एक्टर कल्याण जी जाना यांनी केले होते सूत्र संचलन प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन आहुजा यांनी केले

Recent Posts