मुलांना लातूर येथेल शिक्षण मिळावे म्हणून दोन महिला शिक्षकांनी चक्क 200 रूपये रोजंदारीवर महिलाना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – आपल्या मुलांना लातूर येथील शिक्षण घेता यावं आणी सोबत राहता यावं म्हणून बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेवरील अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर या महिला शिक्षकांनी चक्क 200 रूपये रोजंदारीवर महिलाना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र बघायला मिळाली

आहे. जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेलूद येथील जिल्हापरिषद शाळे वरील अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर या महिला शिक्षकांनी चक्क 200 रूपये रोजंदारीवर महिलाना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या दोन शिक्षिका या बालसंगोपनाची रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्चं शिक्षण मिळावे या साठी लातूरला असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत

असल्याचे ही समोर आलेय, या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनभिज्ञ कसा ? असा सवाल आता पालक वर्ग विचारत आहे. तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षेकेविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या आहेत, शिक्षणाधिकारी यांना सांगितले आहे. तर तुमच्याकडून काय होते ते करून घ्या, असे उत्तर पालकांना मिळत असल्याचा प्रकार ही पुढे आला आहे. मात्र या प्रकाराकडे स्थानिक शिक्षण विभागाने पूर्णतः दुर्लक्ष केले असून, आता या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागांतील शिक्षकांसह अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक करत आहेत.

Recent Posts