सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मराठवाड्यातील सर्वात मोठ्या ‘ व्हेव पूल ‘ लाटांचा समुद्र या राईडचा शुभारंभ

महाराष्ट्र खाकी (चाकूर / विवेक जगताप) – मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या विशाल जाधव यांच्या वृंदावन वॉटर पार्क मधील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या ‘ व्हेव पूल ‘ लाटांचा समुद्र या राईडचा शुभारंभ राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. बाबासाहेब पाटील यांनी नूतन व्यवसायाबद्दल जाधव परिवाराचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने श्रीकृष्ण सत्यसाई संस्थान

साईनंदनवन या सामाजिक, धार्मिक संस्थेमार्फत गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. संस्थेच्या संकेतस्थळाचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमरावजी जाधव, नगराध्यक्ष कपिल माकणे, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रतीक

लंबे, करीम गुळवे, अविनाश जाधव, शिवाजीराव पाटील, दत्ता निकम, बालाजीदादा सूर्यवंशी, सुभाष काटे, हेमंतराव जाधव, सागर होळदांडगे, यशवंतराव जाधव, माजी उपसरपंच सय्यद मुर्तुजा, गोविंदराव मोरे, वैशालीताई यादव, अनिलराव वाडकर, संदीप शेटे, सय्यद मुन्ना, रामभाऊ कसबे, प्राध्यापक बी.डी पवार, ऍड.संतोष गंभीरे, मधुकरराव मुंडे, बिकाने सर तसेच अमोल व विशाल जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते.

Recent Posts