भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी (अध्यक्ष) मा. नेहरू शंकरराव देशमुख यांनी सुविद्य पत्नी सौ. सुलभा ताई देशमुख यांच्या समवेत भक्ती भावे पूजा केली व शेतकऱ्यासह सर्वांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. कृषीप्रधान भारत देशात कृषीशी निगडित अनेक सणवार साजरे होतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या यानिमित्ताने भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी

(अध्यक्ष) मा. नेहरू शंकरराव देशमुख यांनी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतात जाऊन शेतातील देवतांची आणि काळ्या आईची मनोभावे पूजा करून वेळ अमावस्या साजरी केली. वेळाअमावस्येचे शेतकरी बांधवांच्या जीवनात फार महत्त्व आहे. आपल्यासह संपूर्ण जगाचे पोट भरणाऱ्या आपल्या काळ्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात, यथासांग पूजा केली जाते, शेतातील

पांडवांना नवा रंग दिला जातो, रब्बी हंगामातील गहु, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकाचा ‘रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे’ अशी प्रार्थना करून शेतकरी आपल्या कष्टाला भरभरून यश मिळावे अशी अपेक्षा करतो. देशमुख कुटुंबीयांच्या वतीने ही लातूर तालुक्यातील मौजे खाडगाव येथील शेतात वेळ अमावस्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी (अध्यक्ष) मा. नेहरू

शंकरराव देशमुख यांनी सुविद्य पत्नी सौ. सुलभा ताई देशमुख यांच्या समवेत भक्ती भावे पूजा केली व शेतकऱ्यासह सर्वांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी सर्वांनी मिळून स्नेहभोजनाचा आनंद घेतला याप्रसंगी महिला पुरुष आबाल वृद्ध मित्रपरिवार व इतर अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts