महाराष्ट्र खाकी ( अहमदपूर / विवेक जगताप) – भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिद्दे पाटील यांनी तळेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील 75 टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने (Waqf Board) दावा केला आहे. गावातील 103 शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीचा यात समावेश आहे. यामुळं आता अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे.
पण भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिड्डे पाटील यांनी शेतकऱ्यांना न घाबरण्यास सांगितले आहे, वक्फ बोर्डाला एक इंच पण जमीन जाऊ देणार नाही आणि या प्रकरणात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असल्याचे सांगितले आणि कायदेशीर आणि जी आर्थिक मदत लागेल ती भाजप किसान मोर्चा करेल असे सांगितले पुढे बोलताना संदीप गिद्दे पाटील म्हणाले की दिल्लीत चालू असलेल्या अधिवेशनात वक्फ बोर्ड रद्द करावा आशा
मागणी साठी राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना भेटून आवाहन करणार असल्याचे सांगितले, शेतकरी नेते आणि भाजपा किसान मोर्चाचे संदीप गिद्दे पाटील हे देशातील विवीध राज्यातील शेतकरी आंदोलनात सक्रीय सहभाग असलेले नेते आहेत, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी या आधी ही आवाज उठवला आहे, आता ते अहमदपूर येतील तळेगावच्या शेतकऱ्यांसाठी पुढे आले आहेत, तळेगावातील पिडीत सर्व शेतकऱ्यांनी संदीप गिद्दे पाटील
आणि भाजपा किसान मोर्चाचे आभार मानले. तळेगावच्या 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर च्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक 17/ 2024 अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसींमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नोटिसा आल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी
एकत्रित येऊन नोटिसला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. वकिलांमार्फत उत्तरही दिलं आहे. मागील तीन ते चार पिढ्यापासून आमच्या ताब्यात असलेली ही जमीन आता परत जाईल या भीतीने गावातील अनेक शेतकरी दहशतीत होते पण भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री संदीप गिद्दे पाटील यांच्या भेटीने शेतकरी भय मुक्त झाल्याचे बोलले जात आहे.