विकासाचे शिलेदार होण्यासाठी सर्व बुथप्रमुखांनी आगामी 25 दिवसांचा कालावधी पक्षासाठी द्यावा – आ.संभाजी पाटील निलंगेकर

महाराष्ट्र खाकी ( शिरूर अनंतपाळ/ प्रतिनिधी ) –  निलंगा विधानसभे अंतर्गत शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक विकास कामे झाली आहेत.विकासाची ही गती कायम राखत प्रगती करण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली आहे.या विकासाचे शिलेदार होण्यासाठी सर्व बुथप्रमुखांनी आगामी 25 दिवसांचा कालावधी पक्षासाठी द्यावा,असे आवाहन माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर अनंतपाळ येथील पांढरवाडी मोड परिसरातील साई मंगल कार्यालयात साकोळ जिल्हा परिषद गटाचा आणि शहरातील अनंतपाळ मंगल कार्यालयात शिरूर अनंतपाळ शहरातील बुथ प्रमुखांचा

विजय संकल्प बुथप्रमुख मेळावा संपन्न झाला.यावेळी बुथप्रमुखांना मार्गदर्शन करताना आ.निलंगेकर बोलत होते. साकोळ गटाच्या मेळाव्यास भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिपचे माजी सभापती गोविंद चिलकुरे,ऋषिकेश बद्दे,अनिल शिंदे,माजी उपसभापती भिक्काताई, निवृत्त मुख्याध्यापक बालाजी जाधव, ॲड. ज्ञानेश्वर चेवले,शेषराव ममाळे यांची उपस्थिती होती.शिरूर अनंतपाळ शहराच्या मेळाव्यास या मान्यवरांसह ज्येष्ठ कार्यकर्ते व्यंकटेश देवशेटवार,अप्पाराव नाटकरे,शंकर बेंबळगे, शहराध्यक्ष संतोष शेटे, नगराध्यक्षा मायावती धुमाळे,माजी सभापती धोंडीराम सांगवे,गणेश

सलगरे,गणेश धुमाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आ.निलंगेकर म्हणाले की,शिरूर अनंतपाळ शहर आणि तालुक्यावर माझे विशेष प्रेम आहे.तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून या माध्यमातून तालुक्याचा कायापालट झाला आहे. तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला आहे.हक्काच्या पाण्यासाठी पाठपुरावा केला आहे.शिरूर अनंतपाळ तालुक्यातून रेल्वे जावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला गती मिळवून देण्याचे काम आपण केले आहे.
भविष्यासाठीही आराखडा तयार केला आहे.विकासाचे हे व्हिजन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बुथ प्रमुखांनी आगामी 25 दिवस झोकून देऊन काम करावे,असे ते म्हणाले.

आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले की, विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही.सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. केवळ अपप्रचार सुरू आहे.त्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.केवळ खोटी बतावणी करून मतदारांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत आहेत.या निवडणुकीच्या माध्यमातून स्वहितासाठी राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी याप्रसंगी बोलताना केले. याप्रसंगी अरविंद पाटील निलंगेकर,गोविंद चिलकुरे, ऋषिकेश बद्दे, संतोष शेटे,धोंडीराम सांगवे,संजय दोरवे यांचीही भाषणे झाली. या दोन्ही मेळाव्यांना बूथप्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Recent Posts