महाराष्ट्र खाकी (अहमदपूर / विवेक जगताप ) – अहमदपूर – चाकूर मतदारसंघातील जनता दोन्ही पाटलांच्या हुकूमशाही कारभाराला पूर्णपने कंटाळली आणि भीतीत असलेल्या जनतेला एक सामान्य माणूस असलेला उमेदवार या निवडणुकीत मिळाला आहे अशी चर्चा अहमदपूर मतदारसंघात आहे. जिल्हा परिषद सदस्य
असताना माधव जाधव यांनी लोकांमध्ये सहज मिसळून मिळून लोकांची कामे केली आणि आपल्या सर्कलचा विकास केला आहे, आता माधव जाधव हे विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत त्यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन
लोकांच्या गाटी भेटी घेत आहेत. लोकांना विश्वास देत आहेत की तुमच्या समस्या सोडवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करेन, आणि माधव जाधव यांना लोकांचा ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहमदपूर मतदारसंघातील लोक अगोदरच्या आमदारांना आणि त्यांच्या कारभाराला पुरते कंटाळले आहेत माधव जाधव
यांच्या माध्यमातून एक नवा पर्याय लोकांना मिळाला आहे. जमिनीवर राहून लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या कशा सोडवायच्या यांचा अनुभव माधव जाधव यांना चांगला आहे, माधव जाधव यांच्या प्रचाराची धुरा सामान्य माणसाने हातात घेतल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे म्हणून तर माधव जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.