महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – औसा मतदारसंघात विकासाची गंगा आणून कायापालट करणारे आमदार अभिमन्यू पवार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज दखल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले येणार, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श
डोळ्यासमोर ठेऊन लोकसेवा करणारे अभिमन्यू पवार हे श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या उपस्तित उमेदवारी अर्ज दि. 25 ऑक्टोबर रोजी दाखल करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि विश्वासू असलेले आणि औसा मतदारसंघांत विवीध विकासाची कामेकरून मतदारसंघाचे रुपड बदलणारे, जनतेला
आपलेसे वाटणारे औसा मतदारसंघांचे महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आमदार अभिमन्यू पवार हे दि. 25 ऑक्टोबर रोजी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत . अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघात मागचे 5 वर्ष आमदार म्हणून काम करताना, जनहिताच्या
प्रत्येक कार्याला प्रयत्नाला, प्रत्येक उपक्रमाला जनतेचे भक्कम पाठबळ कायम लाभले आहे हे अभिमन्यू पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने दाखवून दिले आहे. अभिमन्यू पवार हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी 9 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर, औसा ते तहसील कार्यालय, औसा दरम्यान रॅली काढणार आहेत, या रॅलीला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत अशी नम्र विनंती अभिमन्यू पवार लोकांना यांनी केली आहे.