महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – राज्यात आणि लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षण आणि मराठ्यांच्या विकासाबाबद विरोधी भूमिका घेणाऱ्या फडणवीस यांना राज्यातील मराठ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानातून जसा विरोध केला तसाच विरोध विधासभेच्या निवडणुकीत सर्व मराठा समाज करत असल्याचे चित्र
सध्या राज्यात दिसत आहे. याच प्रमाणे लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील आमदार फडणवीस यांचे विश्वासू अभिमन्यू पवार यांच्या बाबतीत मराठा समाज करत आहेत, त्याला अनेक करणे आहेत लातूर जिल्ह्यात प्रमुख अधिकारी म्हणून पवार यांनी येऊ दिले नाही, औसा मतदारसंघातून कोणताही मराठा समाजाचा माणूस मोठा
केला नाही, जाणूनबुजून मराठा समाजाच्या माणसांना वेगळी वागणूक दिली आणि विशेष म्हणजे मराठा समाजाच्या गुत्तेदारांचे बिले न काढता दुसऱ्याचे बिले काढणे अशा प्रकारे अभिमन्यू पवार यांनी मराठा समाजाला वागणूक दिली याबद्दल त्यांच्याबद्दल मतदारसंघात आणि जिल्ह्यात रोष आहे, यात भर घातली
ती म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांना अटक करा आणि त्यांची SIT चौकशी च्या मागणीला विधासभेत जोरात टेबल वाजवून समर्थन दिले या मुळे तर जिल्ह्यातील आणि औसा मतदारसंघातील मराठा मतदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात जाणार असे चित्र दिसत आहे.