महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप) – लातूर सह महाराष्ट्र राष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उदय पाटील यांनी निर्माण केलेल्या वृंदावन कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण विहार येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण गुरुवर्य ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते व वे.शा.स. माधवाचार्य पिंपळे महाराज यांच्या पौरोहित्याखाली हा कार्यक्रम पार पडला.या कार्यकमाला राज्याच्या माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्तित होते . लातूर सह
महाराष्टातील बांधकाम क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उदय पाटील आहेत. लातूर मध्ये गुणवंतांची खान आहे त्यातील एक म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उदय पाटील हे केवळ लातूरातच नव्हे तर देशात व देशाबाहेरील कानाकोपऱ्यात लातूरचे नावलौकिक गाजवत आहेत. उदय पाटील यांनी लातूर येथे बांधकाम क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शहरात हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न
असते. या स्वप्नांची पूर्तता करताना स्वप्न योग्य रीतीने पूर्ण व्हावे व त्या स्वप्नात कोणताही मिठाचा खडा पडू नये, अशी प्रामाणिक भावना ठेवून उदय पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले व या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केवळ ग्राहकच नव्हे तर एक परिवार तयार केला आहे. या परिवाराच्या माध्यमातून त्यांनी अल्पवधीतच गरुडझेप घेतली आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी लातूर शहरातीलच नव्हे तर लातूर जिल्ह्यातील अनेक
नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे तसेच तो जोपासला आहे. याच विश्वासास पत्र ठरलेल्या आणि लोकांच्या पसंतीस उतरलेला उदय पाटील यांच्या वृंदावन कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण विहार येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्सहात आणि भाव भक्तीत पार पडला, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा वेवस्तीत आणि यशस्वी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि उदय पाटील यांचे बंधू डॉ. अमित पाटील यांनी नियोजन केले, या प्रसंगी राज्याच्या माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते