महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनीधी ) – रवीवार दि. 13 ऑक्टोबर 24 लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट महापालिकेने आता नवीन एजन्सी अशोका एंटरप्राइजेसला दिले आहे. कचरा व्यवस्थापन करण्यासाठी, कचरा घंटा गाडीची नोंद होण्यासाठी प्रत्येक दारासमोर क्युआर कोड स्कॅनर बसवण्यात येत असून
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी शहरातील सावेवाडी या ठिकाणी स्कॅन करून सदरील सुवीधेचा शुभारंभ केला. एजन्सीकडून नव्याने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमा बददल कौतूक करुन प्रभावी कचरा व्यवस्थापन करुन संपूर्ण शहर स्वच्छ सुंदर करण्याचे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले. लातूर शहरातील सावेवाडी
परीसरात माजी मंत्री आमदार अमित देशमुख तसेच खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत लातूर शहर पालीकेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत तयार करण्यात आलेल्या क्युआर कोड सुवीधेचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील प्रत्येक घरासमोर क्युआर कोड स्टिकर लावण्यात येणार आहेत. या सुवीधेमुळे दररोज
येणाऱ्या घंटागाडीची नोंद होणार आहे. यामुळे नागरीकांची गैरसोय दूर होऊन शहर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नव्या एजन्सिीने अधिकची यंत्रणा लावून शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्यात यावा असे असले तरी ही यंत्रणा अधिक गतिमान करावी, कोणत्याही
परिस्थितीत घंटागाडी दररोज नियमित करावी, शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी यापुढे कुठेही कचरा साचणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नवीन एजन्सी व महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मागच्या काही महिन्यापासून लातूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर
बनला होता. आमदार अमित देशमुख यांनी या विषयावर अनेक वेळा, महापालिका प्रशासनासोबत बैठका घेतल्या, जुन्या कंत्राटदार एजन्सीला व्यवस्थित काम करण्याबाबत सूचना दिल्या, मात्र या कामकाजात सुधारणा होत नव्हती, आमदार अमित देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित केला
होता. नवीन कंत्राट देताना जुन्या एजन्सीला काम देण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी केली होती. या प्रश्नावरून मध्यंतरी निविदा प्रक्रिया खोळंबली होती. प्रकरण न्याय प्रविष्ट झाले होते, मात्र अखेर लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम मुंबईस्थित अशोका इंटरप्राईजेस या कंपनीला मिळाले असून कंपनीने शहरात काम सुरू केले
आहे. अशोका एजन्सीने आता लातूर शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम सुरू केले आहे, जास्तीची टिप्पर, जेसीबी व इतर यंत्रणा लावून शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्यात यावा, हे काम संपल्यानंतर सर्व शहरात दररोज घंटागाडीने कचरा जमा करावा, घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत जाईल अशी व्यवस्था पहावी,
ओला व सुका कचरा वर्गीकरणा संदर्भात नागरिकांत जागरूकता निर्माण करावी, बंद गाडीतूनच कचरा शहराबाहेर जावा, डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्यावर नियमितपणे प्रक्रिया करावी आदी सूचना आमदार अमित देशमुख यांनी महापालिका प्रशासन व नवीन कंत्राटदार यांना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आता प्रत्यक्ष काम सुरू
झाले आहे, आमदार अमित देशमुख व महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार, लातूर शहरात ठीकठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून त्यासाठी अतिरिक्त यंत्रणान लावण्यात आली आहे, येत्या काही दिवसात पूर्वी हे काम पूर्ण करून त्यानंतर अगदी
शास्त्रशुद्ध पद्धतीने शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यात येईल, घंटागाडीची नियमीतता तपासण्यासाठी शहरातील प्रत्येक घरासमोर क्युआर कोड स्कॅनीग स्टिकर बसवण्यात येत आहेत. आता पर्यंत शहरातील 1 लाख घरासमोर हे स्टिकर बसवण्यात आले असून एक दोन दिवसात टप्प्याटप्प्याने सर्व क्युआर कोड ऑन लाईन स्टिस्टीमवर
येतील त्या नंतर कोणत्या घरासमोर घंटगाडी गेली नाही हे लगेच लक्षात येणार आहे, असे स्वच्छता निरीक्षक रमाकांत पिडगे, बंडू किसवे यांनी यावेळी सांगीतले.