विरोधी पक्षातील आमदार असतानाही सरकार दरबारी प्रयत्न करून 1500 कोटी रुपयांची विकासकाने खेचून आणली – आमदार धीरज देशमुख

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भातांगळी जिल्हा परीषद सर्कलमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद बैठक रविवारी घेण्यात आली यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी मागच्या पाच वर्षाच्या काळात लातूर ग्रामीण विधानसभा

मतदार संघात मी विरोधी पक्षातील आमदार असतानाही सरकार दरबारी प्रयत्न करून 1500 कोटी रुपयांची विकासकाने खेचून आणली असून त्यात भातांगळी जिल्हा परिषद सर्कल मध्ये 16 गावात 229 कामे मंजूर करून तब्बल 17 कोटी रुपये विविध विकास कामासाठी निधी आणला अनेक कामे झाली तर काही कामे प्रगती पथावर

असल्याचे सांगून जिल्हा बँकेच्या माध्यमातून लाडकी बहिण योजना अंतर्गत जिल्ह्यातील 32, 000 खाते उघडून महिला भगिनींना निःशुल्क सेवा दिली आहे ही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले आहे आगामी काळात मतदारांनी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी करून लोकांच्या प्रगतीसाठी  विकासाचा वेग अधिक सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसला अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन आमदार धीरज देशमुख केले.

Recent Posts