Latur लातूरच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद दिल्यास लातूर शहराला चंदीगड बनविण्याचे काम आपण करू – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूरच्या सत्ताधार्‍यांकडे साडेआठ वर्षे मुख्यमंत्री व तेवीस वर्षे मंत्री म्हणून पदावर असतानाही त्यांनी लातूर शहराचा फारसा विकास केलेला नाही. लातूरच्या विकासात भर पाडणारा एखादा उद्योगही आणलेला नाही. एक उद्योग आणला तोही भाजपाने बोगी कारखाना या माध्यमातून अनेकांना

रोजगार मिळालेला आहे. लातूरच्या आमदाराने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उजणीचे पाणी लातूरला दोन महिण्यात आणू अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊ असे आश्‍वासन देऊनही उजनीचे पाणी आणण्यास त्यांना यश आलेले नाही. या बाबीची नैतीक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणे आवश्यक

होते, परंतु तो ही त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे स्वार्थी भूमिकेतून आणि नैतिक मुल्य बाजूला सारून काम करणार्‍या सत्ताधार्‍यांना पायउतार करून विकासाच्या भूमिकेतून काम करणार्‍या भाजपाच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहा लातूरच्या जनतेने भाजपाला विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद दिल्यास लातूर शहराला चंदीगड

बनविण्याचे काम आपण सर्वांना सोबत घेऊन करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. ते भाजपा युमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या जनसेवेचा महायज्ञ व लाभार्थी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी

बोलत होते. कार्यक्रामाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 306 लाभार्थ्यांना निवडीचे प्रमाणपत्र, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत 700 लाभार्थ्यांचा सन्मान व 800 बांधकाम कामगारांना भांडी व पेटी किट्सचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास भाजपा, भाजपा युवा मोर्चाचे पक्ष पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

Recent Posts