रयत प्रतिष्ठानचे कार्य युवकांना प्रेरणादायी सद्गुरू ह‌.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे प्रतिपादन.

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचा नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्त भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात रक्तदान शिबिर व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे सहअध्यक्ष सद्गुरु ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, पोलीस उप अधीक्षक गजानन

भातलवंडे, संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, कृषी पर्यवेक्षक तथा मार्गदर्शक सूर्यकांत लोखंडे, ॲड वैशालीताई यादव, उपाध्यक्ष सचिन फत्तेपुरे उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक तथा मार्गदर्शक सूर्यकांत लोखंडे यांनी प्रास्ताविक करताना 2015 पासून रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

यात स्वच्छता, रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड व संवर्धन, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करणे आदी कार्याची माहिती दिली.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय रयतरत्न महाराष्ट्र भूषण आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन, रयतरत्न मराठवाडा

भूषण रॉबिन हूड आर्मी, लातूर, कृषिरत्न सयाजी गायकवाड, कृषी पर्यवेक्षक (बार्शी), समाज रत्न राहुल भड (सहारा वृद्धाश्रम गौडगाव), शिक्षकरत्न प्रा. डॉ. दिलीप नागरगोजे, उद्योगरत्न अनंत गायकवाड (ॲग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी गंगापूर), ग्रामरत्न ग्रामपंचायत कार्यालय गणेशवाडी, दिव्यांगरत्न प्रा. बाळासाहेब

चव्हाण, वृक्षरत्न पद्माकर बागल (लातूर), आरोग्यरत्न जयश्री कदम,  पत्रकाररत्न संजय राजूळे, (संपादक कालपरिवर्तन), विद्यार्थीरत्न कु. अवनी अर्जुने (धाराशिव), रयत भूषण नेताजी रणखांब (खुलगापूर) यांना पूरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे यांनी रयत प्रतिष्ठानच्या

कार्याचे कौतुक केले. समाजातील उपेक्षित व गरजूंना आपली सदैव मदत व्हावी अशा सदिच्छा याप्रसंगी व्यक्त केल्या. सद्गुरु ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याप्रसंगी सांगताना कष्ट करायला मन सदृढ व निरोगी असावं लागतं, समाजामध्ये अनेक चांगली कार्य सुरू आहेत, सध्या सामाजिक हितासाठी सर्वजण

धडपडतोय, तरुण मंडळी एकत्र येऊन समाजातील विकृतीकारक घटना पासून ईतर तरुणांना परावर्त करावे, व्यसनापासून दूर रहावे शेती आणि शेतकरी हितासाठी सदैव प्रयत्नशील असावेत. रयत प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, समाजासाठी उपयोगी आहे असे शब्दगौरव याप्रसंगी केले. अध्यक्ष रामदास काळे यांनी

रयत प्रतिष्ठानच्या आगामी कार्यक्रमाची माहिती दिली. शेतकरी, गरजू विद्यार्थ्यांना मदत आणि रक्तदान यामध्ये उल्लेखनीय काम करू असे प्रतिपादन केले. यावेळी 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सूत्रसंचलन सुनीलकुमार डोपे यांनी केले तर आभार ॲड. वैशालीताई यादव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्वेताताई लोंढे, अर्चना

डोपे, आकाश रणखांब, अजित फुलारी, विनायक सूर्यवंशी, अमोल जोशी, फिरोज शेख, मनोज उळागड्डे, श्रीधर सूर्यवंशी, सतीश जाधव, राम चौथवे, प्रल्हाद काळे, ओमकार सोमवंशी, श्रीराम कुलकर्णी, संजय मोरे, रवी दुडीले, धनंजय येदले, कमलाकर सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, शिवाजी पाटील, किरण जाधव, राहुल साकोळे,

प्रशांत लोंढे, किरण कदम, नवनाथ भोसले, प्रभाकर जाधव, आशिष मस्के, मनोज गायकवाड, विश्वजीत सांगवे, सुमित कोडगिरे, आकाश सावंत, प्रतिक जाधव,धनंजय मोहिते, ताहेर शेख, शुभम आवाड यांनी प्रयत्न केले.

Recent Posts