लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी जगभरातील लातूरकर मातृभूमी विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून येणार एकत्र

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा भारताच्या विकासासाठी प्रयत्नशील असतात त्याच प्रमाणे लातूरचे बांधकाम उद्योजक उदय पाटील मातृभूमी विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून लातूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार, लातूर येथील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक उदय पाटील यांनी लातूरच्या

सर्वांगीण विकासासाठी जगभरातील लातूरकरांना मातृभूमी विकास फाऊंडेशन च्या माध्यमातून एकत्र करून लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे त्यांच्या या मातृभूमी विकास फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण काही दिवसापूर्वी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे

यांच्या हस्ते झाले. उदय पाटील यांनी लातूरच्या विकासासाठी मातृभूमी विकास फाऊंडेशनची सुरुवात करून लातूर साठी काहीतरी करू इच्छिनाऱ्या लातूरकरांसाठी “मातृभूमी विकास फाऊंडेशन” एक व्यासपीठ ठरणार आहे. भारताला मातृभूमी मानून त्याच्या विकासासाठी प्रसिद्ध योद्योजक रतन टाटा नवनवीन प्रयोग

करत असतात त्याच प्रमाणे उदय पाटील यांनी लातूरच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जगभरातील लातूरकरांना मातृभूमी विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण, उद्योग, व्यापार, कृषी, रोजगार, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, मृदसंधारण, माहिती तंत्रज्ञान, आर्थिक, आरोग्य, पाणी,

स्वच्छता, दळणवळण, क्रीडा, बांधकाम, सांस्कृक्तिक, जैवतंत्रज्ञान, महिला सशक्तीकरण, पशुसंवर्धन या व इतर विविध क्षेत्रांत लातूरचे भूमिपुत्र देश आणि जगभर काम करीत आहेत. अनेक जण विविध संस्था व कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ आहेत. या साऱ्या मंडळींच्या ज्ञानाचा त्या-त्या क्षेत्रात जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन व

ज्याच्या त्याच्या परीने योगदान घेतले जाणार आहे. निलंगा येथील गिरबने नावाचे कृषी क्षेत्रात मोठे व्यक्ती आहेत. ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या शिष्टमंडव्यत परदेशात जात असतात. अशा भूमिपुत्रांचा जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे.

Recent Posts