महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – भारतीय किसान युनियन मराठवाडा अध्यक्ष नेहरू भाऊ देशमुख यांनी विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा दिला. मागील 11 दिवसापासून उपोषणाला बसलेले शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणाला राकेश टिकैत यांच्या भारतीय किसान युनियन
तर्फे जाहीर पाठिंबा , भारतीय किसान युनियन मराठवाडा प्रभारी (अध्यक्ष ) नेहरू भाऊ देशमुख यांनी शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांची (दि. 28 ) भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. या वेळी मराठवाडा अध्यक्ष नेहरू (भाऊ ) देशमुख म्हणाले की सरकारने विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणाची
दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, आणि जर सरकार या उपोषणाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असेल तर आम्ही या आंदोलन करू आणि शेतकरी हिताचे निर्णय घेयला सरकारला भाग पाडू, सोयाबीनला 8500/ रुपये भाव आणि सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी या मागणीसाठी विजयकुमार घाडगे पाटील यांचे मागील
11 दिवसापासून उपोषण चालू आहे. भारतीय किसान युनियनचे मराठवाडा अध्यक्ष नेहरू (भाऊ ) देशमुख, भारतीय किसान युनियनचे राज्य कार्यकारणी सदस्य गजानन भाई भोसले, आनंद भाई अडसूळे, पत्रकार सचिन सोळुंके, विवेक जगताप, बाळासाहेब जाधव, डॉ. अमित पाटील, हंसराज जाधव, श्रीकृष्ण पाडे उपस्तित होते.