महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याच्या बाजूच्या लातूर जिल्ह्यातील औसा येथे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांचे सोयाबीनला प्रती क्विंटल 8,500/ भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी मागील 9 दिवसापासून आमरण उपोषण
चालू आहे, तरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलनाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना विवीध कार्यक्रम करण्यास वेळ आहे, स्वतःच्या मतदारसंघात विवीध अभिनेत्री यांचे कार्यक्रम करण्यास भरपूर वेळ आहे पण बाजूच्या जिल्ह्यात शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्या उपोषणाला भेट
देण्यास वेळ नाही, की अति पाऊस झाल्यामुळे शेतकरी संकटात आहे तरी कृषी मंत्री आपले कार्यालय आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोडण्यास तयार दिसत नाही. कृषी मंत्री धनंजय मुंढे यांच्या या वार्तानाची शेतकरी आणि सामान्य नागरिक निषेध करत आहे. शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी या आधी ही उपोषण
करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे, पण या वेळेस च्या उपोषणाचा 10 वा दिवस आहे तरी देखील ना कृषी मंत्री धनंजय मुंडे , ना कृषी मूल्य आयीगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे का ? असा प्रश्न शेतकरी आणि सामान्य नागरिकांना पडला
आहे. कृषी मंत्री आणि प्रशासनावर नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर विजयकुमार घाडगे पाटील यांच्या मागण्याचा विचार करावा आणि उपोषण सोडवावे असे शेतकऱ्यांचे जोरदार मागणी आहे.