प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांच्या स्टीम एज्युकेशन सेंटरला “रीड लातूर” चा “उत्कृष्ट विद्यालय” (Best School -2024) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – शिक्षण क्षेत्रातीला लातूर पॅटर्नला नवी ओळख देणाऱ्या प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांच्या स्टीम एज्युकेशन सेंटरला
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “रीड लातूर” द्वारे यावर्षीचा “उत्कृष्ट विद्यालय” (Best School -2024) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लातूर येथे “गुणगौरव, प्रकट मुलाखत व शिक्षक संवाद” सोहळ्याचे अयोजन “रीड लातूर” च्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार धिरज देशमुख , जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर , रीड लातूर च्या संस्थापिका दिपशिखाताई देशमुख , शिक्षणाधिकारी फुटाणे मॅडम,

गटशिक्षणाधिकारी निवृत्ती जाधव , रीड लातूरचे मुख्य समन्वयक राजू पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्टीम एज्युकेशन सेंटर मुळे प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांची लातूरचे रॅन्चो म्हणून ओळख निर्माण झाली आहे. लातूरच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, कॉम्पुटर या सह अनेक विषयांचे शिक्षण

प्रॅक्टिकली मिळवण्यासाठी स्टीम एज्युकेशन सेंटर मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांना यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या या शिक्षण पद्धतीचे कौतुक करण्यात आले आहे. लातूर येथे वाचन संस्कृती वृंधिंगत व्हावी यासाठी उतुंग कार्य करणाऱ्या “रीड लातूर” द्वारे “स्टीम एज्युकेशन सेंटर” ला

दिला आहे, हा “उत्कृष्ट विद्यालय” (Best School 2024) पुरस्कार प्रा. ओमप्रकाश झुरुळे यांनी स्टीम परिवारातील सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना समर्पित केला आहे.

Recent Posts