महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूरच्या विकासासाठी प्रयत्नशील आणि अग्रही असलेले लातूरच्या जनतेला देशमुखांना पर्याय म्हणून लातूरच्या राजरकारणातील तरुण उच्यशिक्षित अजित पाटील कव्हेकर यांनी लातूरच्या विकासाची गाडी कोणी, का आणि कशी थांबवली आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या
माध्यमातून आणि कार्यक्रमातून लातूरच्या जनतेला सांगितलं आहे. परत एकदा अजित पाटील कव्हेकर यांनी लातूरचा विकास न केलेल्या देशमुख यांच्या बद्दल बोलले आहेत. अजित पाटील कव्हेकर म्हणाले की साडेआठ वर्षे मुख्यमंत्री व 20 वर्ष मंत्री पदावर काम करूनही लातूरातील सत्ताधार्यांनी लातूरचा कसलाही विकास
केलेला नाही. तरीही चाळीस वर्षापासून लातूरकरांचे आशीर्वाद त्यांच्याच पाठीशी आहेत. परंतु लातूरच्या मुलभूत समस्या मात्र अद्यापही सुटलेल्या नाहीत. अजित पवारांनी बारामती व पुणेचा चौफेर विकास केल्यामुळे लातूरातील बहुतांश तरूण नोकरीसाठी पुण्यात गेलेले दिसून येतात. परंतु देशमुखांनी मात्र गेल्या चाळीस वर्षात
लातूरचा शाश्वत पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे कामही केलेले नाही. त्यामुळे पाणीच नाही तर उद्योग कुठून येणार असा सवाल लातूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. पुणे-मुंबईला भूयारी गटारे आहेत. परंतु लातूरात मात्र थोडाही पाऊस झाला तरी गटारीचे घान पाणी रस्त्यावर व घरात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे प्रश्न जाणून
घेण्यासाठी लातूरच्या आमदारांना वेळ नाही त्यामुळे मी लातूरच्या कुठल्याही प्रश्नावर भाजपा व भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करतो. त्यामुळे लातूरकरांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणार्याच्या पाठीशी आपण सक्षमपणे उभे रहावे असे आवाहन भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.