लातूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई. 02 लाख 94 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, 21 गुन्हे दाखल

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई. 02 लाख 94 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, 21 गुन्हे दाखल करून जिल्ह्यातील अवैध धंधे चालकांवर मोठी कारवाई केली आहे. लातूर पोलीस अधीक्षक आणि लातूर LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी

वेळोवेळी मोहीम राबवून कारवाया करून संबंधितावर गुन्हे दाखल केले, लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करण्याचा संशय असलेले 17 मोठे गोडाऊन, तसेच ज्या इसमावर या अगोदर प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाळगल्यावरून गुन्हे दाखल झालेले आहेत अशा इसमांचे राहते घर, आस्थापना

तपासण्यात आले. सुगंधित पान मसाला व गुटख्याची विक्री करणाऱ्या 596 पान टपऱ्याची तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला मिळून आलेल्या इसमावर एकूण 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दि. 24/09/2024 रोजी संपूर्ण लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलिस ठाणे स्तरावर 44

पोलीस अधिकारी, 163 पोलीस अंमलदारांचे एकूण 25 पथके तयार करून महाराष्ट्र शासनाने विक्री/व्यवसाय साठी प्रतिबंधित केलेल्या गुटखा/पानमसाला ची विक्री करणाऱ्या दुकाने व पान टपऱ्यावर कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य

गुटखाची अवैध विक्री व्यवसाय करीत असलेल्या आस्थापनावर नमूद  अधिकारी व अमलदारांच्या पथकाने छापेमारी करत  महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले  गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 2 लाख 94 हजार 799 रुपयांचा प्रतिबंधित गुटका

व सुगंधित पान मसाला तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. या सर्व गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत. अशा प्रकारची कारवाई यानंतरही सुरूच राहणार असून जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे.

Recent Posts