BDO भालके प्रकरणात आमदार अभिमन्यू पवार यांचे विश्वासू संतोष बेंबडे यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आहे का ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – BDO भालके यांनी संतोष बेंबडे यांच्यावर 10 लाख खंडणी मागण्याचे आरोप केले तसे त्यांच्याकडे पुरावे आहेत अस सांगत असताना तरी पण पोलीस प्रशासन संतोष बेंबडे यांच्यावर खंडाणीचा गुन्हा दाखल करण्यास वेळ का घेत आहे ? का टाळा – टाळ करत आहे ? हा प्रश्न भालके

परिवार आणि सामान्य लोकांना पडला आहे. एक जिम्मेदार आणि मोठ्या पदावर असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यावर अशी वेळ येत असेल तर सामान्य लोकांना पोलीस प्रशासन न्याय कसा देणार अशी चर्चा जिल्हाभारत होत आहे. भाड्याच्या घरात राहत असलेले BDO भालके यांच्या घरात 10-12 लोकांनी हल्ला करून घरच्यांना

(पत्नी, मुलगा आणि आजारी आई ) यांना धक्का बुक्की करत घर घरातील वस्तू बाहेर रस्त्यावर भेकून दिले, या प्रकरणात औसा चे आमदार अभिमन्यू पवार यांचे जवळचे आणि विश्वासू असलेले संतोष बेंबडे यांनी BDO भालके यांना 10 लाखाची खंडणी मागितली आणि माफी मागायला सांगितल अस BDO भालके परिवार सांगत

आहे तरी पोलीस प्रशासन संतोष बेंबडे यांच्यावर माहेरबाण आहेत असे दिसत आहे, पण लातूर जिल्ह्यातील जनतेला असा प्रश्न पडला आहे आणि अशी चर्चा पण आहे की लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असताना देखील एका प्रशासकीय अधिकाऱ्याचे न्यायासाठी इतके हाल होत आहेत, आमदार

अभिमन्यू पवार यांचे जवळचे आणि विश्वासू असलेले संतोष बेंबडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात पोलीस प्रशासन आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यावर राजकीय दबाव आहे का ? जर राजकीय दबाव नसेल तर गुन्हा का दाखल झाला नाही हा प्रश्न जिल्ह्यातील बऱ्याच सामान्य लोकांना पडला आहे आणि भालके परिवाराला पडला आहे. इतक्या दिवसांनी तरी संतोष बेंबडे यांच्यावर तरी गुन्हा दाखल होईल का ?

Recent Posts