LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून LCB ची धडाकेबाज कारवाई

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर LCB पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून LCB ची धडाकेबाज कारवाई केली आहे , लातूर LCB च्या प्रमुख पदी संजीवन मिरकले याची नियुक्ती झाल्यापासून लातूर LCB च्या कामात कमालीचा बदल दिसून आला आहे.

संजीवन मिरकले यांनी आपल्या खास पद्धतीने जिल्ह्यात झालेले मोठे गुन्हे मग ते खुनाचे असतील किंवा चोरीचे असतील एकदम शिताफीने गुन्ह्यांची उकल करून आरोपीना अटक केली आहे. LCB प्रमुख संजीवन मिरकले यांच्या मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. LCB प्रमुख संजीवन मिरकले

यांच्या नेतृत्वात गातेगांव पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा गुन्हा उकल करून आरोपीना अटक केली आहे. गातेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दिंडेगाव पाटी परिसरात दिनांक 10/09/ 2024 रोजी किरकोळ भांडणावरून काही तरुणांनी मिळून लाकडी दांड्याने एका तरुणाच्या डोक्यात, तोंडावर मारहाण करून खून केल्याची घटना

घडली होती. त्यावरून गातेगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास गातेगाव पोलीस करीत होते. सदरचा गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते. ते आपले राहण्याचे ठिकाणे सतत बदलत असल्याने पोलिसांना सापडत नव्हते. ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक

संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यास चालू केला दरम्यान LCB पथकाला मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून या खुनाच्या गुन्ह्यातील  दोन आरोपी रेनापुर फाटा ते दर्जी बोरगाव जाणाऱ्या रोडवर एका कॉम्प्लेक्स जवळ लपून बसल्याची

असल्याची माहिती मिळाली. त्यावरून LCB पथक तात्काळ तेथे पोहोचून अतिशय सीताफिने या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना दि. 11/09/2024 रोजी ताब्यात घेऊन गातेगाव पोलीस स्टेशन येथे आणले. गातेगाव पोलीस स्टेशन येथे आणून या आरोपीना विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 1) ऋषिकेश

अशोक लोमटे, वय 25 वर्षे, राहणार कासाराजवळा तालुका लातूर. 2) तुकाराम साहेबराव यादव, वय 24 वर्ष, राहणार कासारजवळा तालुका जिल्हा लातूर  असे असल्याचे  सांगितले. त्यांना गातेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच गातेगाव पोलीस स्टेशन यांनीही नमुद

गुन्ह्यातील एक आरोपी 3) प्रीतम अण्णाराव हजारे, वय 21 वर्ष ,राहणार कासारजवळा याला पण अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गातेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार पाटील हे करीत आहेत. कारवाई (LCB) स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात तयार केलेल्या पथकातील पोलीस

अंमलदार रामहरी भोसले, प्रकाश भोसले, राजेश कंचे, चालक पोलीस अंमलदार केंद्रे, सायबर सेलचे पोलीस अमलदार देवडे तर पोलीस स्टेशन गातेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अंमलदार शेख,गिरी, केंद्रे, पतंगे, गुराळे यांनी केली आहे.

Recent Posts