किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीत सगर (मटका किंग ) चा मटका सुसाट, LCB, किल्लारी पोलिसांना हप्ता जातो म्हणे, मग सगर च्या मटक्यावर SP साहेब तुम्ही कराल का कारवाई ?

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप) – किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावात पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे सगर च्या मटक्याच्या सागरात (समुद्रात ) तरुणाई आणि लोकांचे संसार बुडाले आहेत.
गेल्या काही वर्षात किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करून जास्त

नफा कमवण्याच्या मानसिकतेमुळे अवैद्य धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत औसा तालुक्यातील किल्लारी गावात अवैध धंद्यात आणि विशेषतः सगर नावाचा मटका किंगच्या मटका बुकी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. किल्लारी गावातील आणि आसपासच्या गावातील तरुणांची अवैध

धंद्याकडे वाढलेला कल आणि पोलीस प्रशासना कडून दिलेली सूट म्हणजेच दुर्लक्ष यामुळे अवैध धंधे आणि मटका चालवणाऱ्या सगर (मटका किंग ) मालकांना जणू काही मोकळे रानचं मिळाले आहे. दरम्यान सगर च्या मटक्याने औसा तालुक्यातील किल्लारी आणि आसपासच्या गावात मटका आणि अवैध धंद्याचा सुद्धा पुर

आलेला दिसत आहे. किल्लारी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावात रस्त्यावर खुलेआम सगरने मटक्याची दुकाने सजलेली दिसत आहे. मात्र पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. मटक्या सारखे धंदे सर्रासपणे सुरु आहेत. मात्र पोलीस प्रशासन दुर्लक्ष का करत आहे? कुठं तरी पाणी मुरत आहे का?

असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सगर च्या मटक्या मुळे अनेकांचे घर संसार उघड्यावर आले आहे. पैसा नसला तर सगर कडे मटक्याचे आकडे मांडण्यासाठी  चोरी करण्यात सुद्धा तरुणाई घाबरत नाही. त्यामुळे किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांमध्ये पोलिसांविरुद्ध नाराजीचा सुरु उमटत आहे. किल्लारी पोलीस प्रशासनाने या

किल्लारीचा मटका किंग सगर वर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परंतु किल्लारी पोलीस प्रशासन कुठं तरी कमजोर झालेली दिसत आहे.

Recent Posts