महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil ) यांच्याबाबत सातत्याने टिका करणारे भाजपचे आमदार नीतेश राणे यांचा लातूरच्या मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी सौच्यालयाच्या समोर पुतळा जाळून जाहीर तीव्र निषेध केला . नितेश राणे हे फडणवीस
यांचे पाळीव खरजुले कुत्रे आहे त्यांना भाजपमध्ये किंमत नसल्याने त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील (Manoj jarange patil ) यांच्यावर टिका करत असल्याची टिका करीत लातूरच्या मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. भाजपचे (BJP) आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी मराठा
आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका केली होती. तसेच मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर देखील टिका केल्याने लातूर (Latur ) येथे त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील (Manoj jarange patil )
यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक महम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातं आहे. मनोज जरांगे आधुनिक महम्मद अली जिना असे म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) टीका केली
आहे. मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण (Maratha Reservation) मिळवून दाखवलं, असे देखील नितेश राणे म्हणाले त्यांच्या या विधानाचा लातूर जिल्हा अखंड मराठा समाजातर्फे निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी मनोज जरांगे- पाटील यांना डिवचू नये. मराठा समाज शांततेसह संयमाने आंदोलन करीत आहे. त्यांचा अंत बघू नये, असेही आंदोलक म्हणाले.