माजी आमदार पाशा पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात बांधले बांबूचे घड्याळ

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – वातावरण बदलाच्या महासंकटाला सामोरे जाण्यासाठी शाश्वत उपायांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी बांबू लागवडीच्या प्रोत्साहन बरोबरच वीज निर्मितीच्या कामासाठी बांबूचा शाश्वत वापर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. औष्णिक वीजनिर्मितील

केंद्रांतील प्रदूषणकारी कोळशाला बांबू योग्य पर्याय  असून, राज्य सरकारने सर्व औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 5 टक्के बांबू वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास  टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित

पवार यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी हे निर्देश दिले आहेत. नुकताच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अटल बांबू समृद्धी योजनेतून 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करून प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील पडीक जमीनीवर मोठया प्रमाणात

बांबूची लागवडीसाठी राज्य सरकारचे धोरण असून नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड केली जाणार आहे. या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी पाशा पटेल यांनी आज उपमुख्यमंत्री पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांना बांबूपासून बनवलेले घड्याळ,

टॉवेल, स्पिकर, सॉक्स आणि पेन भेट देण्यात आले.
बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना 7 लाख 40 हजार रुपये प्रती हेक्टरी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला लक्षांक देण्यात आला आहे.मानव जातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी 20% ग्रीन कवर आवश्यक आहे.
वातावरण बदलामुळे 50° तापमान झाले तर मेंदु, किडणी,

हृदयावर परीणाम होतो असे सांगणारे संशोधन जगातील दहा संस्थांनी मांडले आहे. यंदा दिल्ली शहाराचे  तापमान 52.9° पर्यंत पोचले होते.मानव जातीच्या अस्तित्वासाठी कार्बन उत्सर्जन पातळी 350 पीपीएम पाहीजे. आता 422 पीपीएम. 450 पीपीएम झाले तर महाविनाश होईल. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर होऊन औष्णिक वीज

निर्मिती केंद्रामध्ये ( थर्मल) बायोमासचा शाश्वत पुरवठा झाला पाहीजे असे आदेश दिले. केंद्राच्या धोरणाप्रमाणे NTPC वर्षाला 400 लाख मे. टन बायोमास आवश्यक असताना फक्त दोन लाख टन पुरवठा होत आहे. सर्व औष्णिक उद्योग प्रकल्पांना बायोबस म्हणून बांबूचा सातत्यपूर्ण शाश्वत पुरवठा करण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्ग काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

Recent Posts