लातूर जिल्ह्यात उद्या 1 ऑगस्ट रोजी दारूविक्री बंद

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2024 रोजी लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी

मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच या कायद्यातंर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अबकारी मद्यविक्री

अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
00:48