मनोज जारांगे पाटील यांचा वाढदिवस लातूर जिल्ह्यात विवीध सामाजिक कार्यक्रम राबवून अखंड मराठा समाज, लातुर साजरा करणार

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांयांचा वाढदिवस लातूर जिल्ह्यात विवीध सामाजिक कार्यक्रम राबवून साजरा करणार असल्याचे अखंड मराठा समाज लातूर यांनी ठरवले आहे. जरांगे पाटील यांनी समाजासाठी जीव पणाला लावून आरक्षणासाठी सरकारशी संघर्ष करत

असतात त्यांनी समाजातील प्रत्येक माणसाच्या मनावर राज्य केले आहे. जारांगे पाटील अखंड मराठा समाजाचे काळीज बनले आहेत, मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रमांनी लातूर जिल्ह्यातील मराठा समाज साजरा करणार असे अखंड मराठा समाज, लातुर यांनी दि. 28 जुलै रोजी बैठक घेऊन

ठरवले . 1 ॲागस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस आहे या निमित्ताने अखंड मराठा समाज, लातुर तर्फे 1 ऑगस्ट रोजी सकाळी 06:00 वाजता सिद्धेश्वर मंदिर येथे अभिषेक करणार आहेत तर 7:30 वाजता गंज गोलाई देवीची आरती, सकाळी 08:00 ते 09:00 श्रीनगर लातुर येथे वृक्षारोपण, सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान

शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे, मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिसानिमित्त गरजु शालेय विद्यार्थ्यांसाठी दानशुराकडुन शैक्षणीक साहीत्य दान करण्याचे आवाहन अखंड मराठा समाज,लातुर केले आहे, हे जमा झालेले शैक्षणीक साहीत्य गरजु विद्यार्थ्यांना दिले जाईल आहे.

दुपारी 12 वाजता शासकिय वैदकीय महाविद्यालयाच्या  रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान केले जाणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता माझं  घर  ( शिक्षणापासून वंचित तसेच निराधार, उपेक्षित घटकातील मुलांचा प्रकल्प) बुधोडा ता‌.औसा येथे अन्नदान करणार आहेत, अखंड मराठा समाज, लातुर तर्फे संघर्ष योद्धा

मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन केली आहे.

Recent Posts