महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील बिघडलेल्या कचरा व्यवस्थापनाचा फटका लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाला ही बसत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोकळ्याजागेत कचराच कचरा दिसून येत आहे. रिकाम्या पाण्याच्या बॉटल, कागदी कचरा, आणि लोकांनी गुटखा, सुपारी खाऊन थुंकून सर्व
परिसर लाल केला आहे. ही खूप मोठी गंभीर बाब असल्याचे नागरिक म्हणत आहेत. जिल्हाधीकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी पदभार स्विकारल्या पासून प्रशासनात सुरळीत पणा आणि कामात होत असलेली दिरंगाई दूर करण्याचे काम करत आहेत आणि केले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या कार्याचे आणि
कार्यपद्धतीचे जिल्ह्यातील कौतुक होत आहे आणि नागरिक समाधान वेक्त करत आहेत. पण जिल्हाधिकारी कार्यालयातील या कचऱ्यामुळे आणि जनआधर या संस्थेच्या ढिसाळ कारभाराचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयाला बसत आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे यांसारख्या महानगरातही कचऱ्याची
समस्या आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र लातूरसारख्या लहानशा शहरातही यासंदर्भात गंभीर समस्या निर्माण व्हावी ही चिंतेची बाब आहे असे लातूरचे आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे मुद्दा उपस्तित करून प्रश्न विचारला आणि चिंता वेक्त केली. सद्या लातूर शहरात सर्वत्र ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिग
दिसत असून त्यामुळे परिसरात दुर्गधी पसरली आहे. शहरातील नागरीकांचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांना वेळोवेळी सूचना देऊनही यात काहीही फरक पडताना दिसत नाही. नागरीक स्वच्छता कर भरतात,शासन अनुदानही देते मात्र कचरा व्यवस्थापनाचे काम व्यवस्थित होत नाही हे दिसून येत आहे.