महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – महायुती सरकारचा महाकल्याणकारी अर्थसंकल्प आहे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत 2024 – 25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला.फेब्रुवारीत वित्तमंत्र्यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या वर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी पोस्ट
करत या अर्थसंकल्पाचे कौतुक आणि स्वागत केले,
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5000 रु. नुकसानभरपाई देण्याचा, 44 लाख कृषी पंप धारक शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते
60 वयोगटातील माता भगिनींना प्रति महिना 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 52 लाख कुटुंबांना प्रति वर्ष 3 गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा, 1 जुलै, 2024 पासून गाय दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. वारकरी बांधवांसाठी
मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे असे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हणले आहे आणि शेतकरी आणि महिला वर्गाचे हित डोळ्यांसमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या जनकल्याणकारी अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले