महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) लातूर कडून अल्पवयीन बालकास कामगार म्हणून ठेवणाऱ्या 2 हॉटेल चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून 2 अल्पवयीन बालकांची सुटका करण्यात आली. 18 वर्षाखालील बालकास स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, वस्तू, सेवांची
विक्री करण्यासाठी व नोकरीच्या उद्देशाने स्वतःच्या आस्थापनेमध्ये गुंतवून ठेवणे, बालकास गुलाम म्हणून वागविणे, बालकाची कमाई रोखून ठेवणे, बालकाच्या कमाईचा स्वतःच्या हेतूसाठी वापर करणे, बालकांकडून शारीरिक श्रम करून घेणे अशा प्रकरणी बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 व बाल व
किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 अन्वये संबंधित स्थापना चालका विरुद्ध कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) लातूर युनिटला काही आस्थापनांमध्ये बालकांचा कामगार म्हणून वापर करण्यात येत आहे याबाबत गुप्त माहिती मिळाली. माहितीची खात्री
करून 2 शासकीय पंचासह मध्यवर्ती बस स्थानक लातूर जवळील 2 हॉटेल आस्थापनांवर वर छापा टाकला असता 14 व 15 वर्षीय उत्तर प्रदेश राज्यातील 2 बालकास बालकामगार म्हणून ठेवल्याचे सहा पोलीस निरीक्षक दयानंद पाटील याच्या टीमच्या निदर्शनास आले. दोन्ही बालकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळा पुढे हजर केले
असता त्यांची रवानगी बाल गृहात करण्यात आली आहे.या प्रकरणी सोलापूर चिकन चायनीज सेंटर मध्यवर्ती बस स्थानका जवळ, हॉटेल चालक फुरकान मुस्ताक कुरेशी रा साठ फुटी रोड, लातूर व हॉटेल टेस्टी झोन काँग्रेस भवन च्या मागे हॉटेल चालक मिनाज युनूस घावरी रा खोरी गल्ली लातूर यांचे विरुद्ध गांधी चौक येथे गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो हवा चित्तलवाड हे करीत आहेत. हि कारवाई लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक दयानंद पाटील , सुभाष सूर्यवंशी पो उप निरीक्षक, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव सुदामती वंगे, लता
गिरी, चालक मनियार सर्व नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) लातूर व चाईल्ड लाईनच्या अलका सन्मुखराव यांच्या पथकाने केली आहे.