गोजमगुंडे परिवाराचा राजकीय आणि अभिनय क्षेत्रातील वारसा पुढे नेणारे विक्रांत गोजमगुंडे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरचे राजकीय मंच गाजवणारे विक्रांत गोजमगुंडे यांनी नटसम्राट या नाटकात भूमिका सकारून (अभिनय) कला मंच पण गाजवले, आणि गोजमगुंडे परिवाराचे राजकीय आणि अभिनय (कला ) वारसा पुढे घेऊन जात आहेत. लातूरच्या प्रतिष्टीत घराण्यामधील एक असलेले गोजमगुंडे

परिवार आहे. गोजमगुंडे परिवारातील विक्रम गोजमगुंडे हे लातूरचे माजी नगरअध्यक्ष राहिले आहेत त्यांनी लातूरच्या राजकारणावर आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्या मुळे गोजमगुंडे परिवाराचा राजकारनाचा वारसा आहे. त्या सोबतच गोजमगुंडे परिवारातील श्रीराम गोजमगुंडे हे कला अभिनय क्षेत्रात मोठे काम करून अभिनय क्षेत्रात ही

गोजमगुंडे परिवाराचा वारसा आहे आता हा हे दोन्ही राजकीय आणि अभिनय (कला) वारसा विक्रांत गोजमगुंडे हे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. विक्रांत गोजमगुंडे यांनी राजकारणात येऊन लातूरच्या जनतेसाठी खूप उल्लेखनीय कार्य केले आणि या कार्याच्या जोरावर त्यांनी लातूर महानगरपालिकेचे महापौर पद ही भूषवले. महापौर

असताना विक्रांत गोजमगुंडे यांनी जे कार्या केले वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळे त्यांनी लातूरच्या जनतेच्या मनात घर केले आणि परिवाराचा राजकीय वारसा यशस्वी चालवत आहेत. आता मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे हे आपल्या परिवाराचा अभिनय (काल) वारसा निभावताना आणि पुढे घेऊन जाताना दिसून येत आहेत. काही

दिवसापूर्वी लातूर शहरात नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग झाला या नाटकात विक्रांत गोजमगुंडे यांनी अतिशय
उत्तम आणि कौतुकास्पद अभिनय करून प्रेक्षकांच्या टाळ्या आणि वाह – वाह मिळवला, आपल्या परिवाराचे राजकीय आणि अभिनय (कला) दोन्ही वारसा एकटे विक्रांत गोजमगुंडे वाढवत आणि चालवत आहेत असे

विवीध क्षेत्रातीला जानकर लोक म्हणत आहेत. राजकीय आणि कला क्षेत्रात उत्तम कामगिरी करून लोकांच्या मनावर राज्य करणारे नेते आणि आता अभिनेते असेलेले विक्रांत गोजमगुंडे हे राज्यातील पहिले असावेत असे कित्येक नगरिक नटसम्राट नाटक पाहताना चर्चा करत होते आणि विक्रांत गोजमगुंडे यांच्या अभिनयचे कौतुक करत होते.

Recent Posts