दयानंद विज्ञान शाखेकडून प्राचार्य दरगड यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – 11 वी पासची TC हवी असेल तर 12 वी च्या फि मधील 25% भरा नाहीतर TC मिळणार नाही, लातूर हे शिक्षणाचे लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे आणि या शिक्षण क्षेत्रातीला निकाला मुळे राज्यतील लाखो विद्यार्थी आणि पालक लातूरला येत असतात पण याच लातूर पॅटर्नला डाग

लावण्याच्या काम लातूर शहरातील दयानंद कॉलेजच्या ( जुनियर ) विज्ञान शाखे कडून प्राचार्य दरगड सरांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे. अनेक पालक आपल्या विद्यार्थ्याला दयानंद कॉलेज मधील विज्ञान शाखेत 11 वि मध्ये प्रवेश घेतात पण काही कारणास्तव 12 वी मध्ये TC काढतात पण ही TC काढताना मात्र कॉलेज या विद्यार्थ्यांकडून 12 वी च्या

वार्षिक फि चे 25% भरा आणि TC घेऊन जा असे सांगितले जाते, गरीब, शेतकरी पालक वर्ग काहीतरी करून, कर्ज काढून हे 25% फि भरून TC काढत आहेत, या सर्व प्रकारात कॉलेजचे प्राचार्य दरगड हे अनेक पालकांना उद्धट बोलून फि भरण्यास सांगतात आणि एखादा पालक मोठा असेल आणि पालकाने शिक्षण

विभागातील, राजकीय नेता, एखादी संघटना किंवा मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा वशिला आणला तर हे 25% न भरता 11 वी पास ची TC देतात आणि गरीब पालकांची आणि विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणून करतात, या सर्व गोष्टी बिनधास्त चालू असतात पण या प्रकरणात शिक्षण विभाग लक्ष घालत नाही म्हणून दयानंद कॉलेज कडून

दरगड सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पैशा साठी एखादा कसाई बकरी कापतो तसे कापले जात आहे. या सर्व गोष्टी मध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी तात्काळ लक्ष घालून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणून थांबवावी नाहीत एखाद्या गरीब पालक किंवा विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलण्याची घटना घडेल..!

Recent Posts