महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – “देवा बरे झाले तुम्ही चार दिवस आधी अवतरलो, नाही तर तुमच्या प्रकट होण्याबाबत देखील वेगवेगळे दावे केले गेले असते… कोणी म्हणाले असते वोह है तो यह भी मुमकिन है, कोणी घोषणा दिली असती जो विष्णू जी की लाये है हम उनको लाने वाले है “पंढरपूरच्या विठ्ठल
मंदिरात पुरातन तळघरात पुरातन मूर्तीसह अन्य वस्तू सापडल्या आहेत यावर लातूरचे माजी महापौर आणी काँग्रेसचे नेते विक्रांत गोजमगुंडे यांनी पोस्ट करत देशाच्या आणी राज्याच्या राजकीय परिस्तिथीला उद्देशून मत वेक्त केले आहे. विक्रांत गोजमगुंडे हे पुरोगामी विचार आणी राजकारणावर प्रघड आभ्यास असलेले राजकारणी म्हणून
ओळखले जातात, विठ्ठल मंदिराच्या जीर्णोध्दाराचं काम सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरुप देण्याचे काम सुरू असताना विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाज्याखाली तळघर सापडले आहे. त्यामध्ये पुरातन मूर्तीसह अन्य वस्तू सापडल्या आहेत. यावर लातूरचे माजी महापौर आणी काँग्रेसचे नेते विक्रांत
गोजमगुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे कि ” बरे झाले देवा.. चार दिवस आधी अवतरलो!” पंढरी मध्ये विठ्ठल मंदिरात आढळून आलेल्या भुयारामध्ये मूर्ती सापडल्या असून या मूर्ती काही शतकं आधीच्या असल्याचे कळते. विष्णू स्वरूपातील मूर्ती रूपाने देव प्रकट झाले. पण देवा बरे झाले तुम्ही 4 दिवस आधी
अवतरलो, नाही तर तुमच्या प्रकट होण्याबाबत देखील वेगवेगळे दावे केले गेले असते… कोणी म्हणाले असते वोह है तो यह भी मुमकिन है, कोणी घोषणा दिली असती जो विष्णू जी की लाये है हम उनको लाने वाले है, कोणी म्हणाले असते की आमच्या पक्षाच्या धोरणांमुळेच मुर्ती सापडल्या, पण सध्या आदर्श
आचार संहिता सुरू आहे आणि काही व्यक्ती मौन आहेत त्यामुळे कदाचित असा काही हलकल्लोळ उडाला नाही. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर 700 वर्षापूर्वीच्या स्वरूपात आणण्याचे कार्य सुरू आहे. फरशी बदलण्याचे काम सुरू असताना आढळून आलेल्या भुयारात विष्णू रूपातील 2,
महिषासुर मर्दिनी रूपातील एक, तसेच अन्य एक मूर्ती आणि पादुका व काही नाणी सापडल्या. याबाबत अभ्यासक आणि पुरातत्व विभाग अधिक प्रकाश टाकेल. पण ही घटना अलौकिक आहे. मंदिराचे पुरातन स्वरूप निर्माण करीत असताना या मूर्ती सापडणे हा दैवी योगायोगच ठरावा.