महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील भाग्यश्री सुडे खून प्रकरणात विरोधकांवर आरोप करण्याच्या नादात स्वतःवर आणी माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्यावरच या खून प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा केला आरोप, लातूर लोकसभेच्या प्रचाराचा दुसरा टप्पा सुरु झाला तसे राजकीय नेते आरोप
प्रतिरोप करत आहेत पण आरोप करत असताना तोच आरोप स्वतःसह आपल्या मोठ्या भावावरच केल्याची घटना लातूर ग्रामीणचे आमदार यांच्याकडुन उदगीर येथील प्रियंका गांधी यांच्या सभेत झाली आहे. आमदार धिरज देशमुख यांनी आपल्या भाषणात म्हणाले कि ” तिच्या (सुडे) परिवाराने आणी लातूरच्या सर्व नागरिकांनी मागणी
केली कि त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, फास्टटॅग कोर्ट निर्माण केले पाहिजे, SIT चौकशी केली पाहिजे पण या जिल्ह्यातले सत्ता करणारे असतील, सत्ताधारी असतील , पालकमंत्री असतील , विरोधी पक्षातील आमदार असतील या पैकीही भ्र शब्द काढला नाही कि त्या परिवाराला आश्वासन दिले नाही कि शासनाने किंवा
महाराष्ट्र राज्याने SIT निर्माण करू असा एकही शब्द दिला नाही का दिला नाही ? हा प्रश्न विचारला पाहिजे ” असे आमदार धिरज देशमुख म्हणाले पण आपल्याकडून झालेली चूक कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून धिरज देशमुख यांनी सभेतील जनतेकडे हात करत या कुटुंबाला या मुलीला न्याय मिळाला पाहिजे कि नाही ? असा प्रश्न
दोनदा विचारून झालेली चूक सावरण्याचा प्रयत्न करत राहिले आणी पुढे म्हणाले कि जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न हा सवाल तुम्हाला विचारल्याशिवाय सोडणार नाही त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचाय, त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचाय असे म्हणत ही संस्कृती महाराष्ट्राची नव्हती ” असे म्हणत दुसऱ्या विषयाला धिरज
देशमुख यांनी हात घातला आणी झालेली चूक, घटना सावरून घेतली. पण सभेतील नागरिक (मतदार) आणी स्टेजवरील नेते कार्यकर्ते चर्चा करत होते कि त्या अन्याय झालेल्या परिवाराचा खून प्रकरणाचा राजकारणासाठी आणी विरोधकांवर आरोप करण्यासाठी मुद्दा केला पण आरोप करण्याच्या नादात धिरज देशमुख यांनी अमित
देशमुख आणी स्वतःवरच आरोप करून घेतले. आता विरोधक या गोष्टीचा मुद्दाकारून अमित देशमुख, धिरज देशमुख आणी काँग्रेसवर निशाणा साधतील जसा अमित देशमुख आणी त्यांच्या नेते आणी कार्यकर्त्यांनी सुधाकर शृंगारे यांच्या कडून एका सभेतील भाषणात बावनकुळेना बावनसुळे आणी आजी आमदारांना माजी आमदार म्हणून
उल्लेख केला तर शृंगारे यांनी भविष्य सांगितलं आहे से म्हणत आहेत तर धिरज देशमुख यांनी इतक्या गंभीर आणी नाजूक प्रकरणात स्वतः सह सत्ताधारी, पालकमंत्री आणी अमित देशमुख यांच्यावर आरोप केला आहे का ?