महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – मागील पाच वर्षात खासदार सुधाकर शृंगारे यांना लातूर क्रीडासंकुल येथे पिण्याच्या पाण्याची वेवस्था करता आली नाही, पण करोडोचे कंत्राट घेऊन पुण्यातील बालेवाडीचे क्रीडासंकुल बांधून खूप पैसा कमावला, मग लातूर क्रीडासंकुल येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा कारण्यासाठी
शृंगारेना पैसे द्यावे लागतील का ? असा प्रश्न लातूरचे मतदारांना पडला आहे. व्यवसायाने कॉन्टॅक्टर असलेले आणी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी पुण्याचे बालेवाडी येथील क्रीडासंकुलाचे काम सर्वोत्तम केले ते व्यवसाय आणी पैशा साठी पण लातूर लोकसभेचे खासदार यांना त्यांच्या मतदार संघात असलेले लातूर
क्रीडासंकुल येथे मागील पाच वर्षात खेळाडूंसाठी आणी सामान्य लोकांसाठी साधी पाणी पिण्याची वेवस्था करता आली नाही. लोकांनी निवडून दिले लोकांचा त्रास कमी होईल म्हणून पण खासदारांना लोकसेवे पेक्षा त्यांचा व्यवसाय महत्वाचा आहे असे मागील पाच वर्षाच्या त्यांच्या कारभारावरून दिसून आले. तर मग लातूरकर दुसऱ्यांदा
शृंगारेना का निवडून देतील ? लातूरकरांनी 2019 ला निवडून दिलेले खासदार सुधाकर शृंगारे यांनी खासदारकीचा उपयोग फक्त त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी केला मात्र लातूर लोकसभा क्षेत्राचा विकास मात्र काही झाला नाही असे मतदारांना दिसून येत आहे.